कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही – डॉ.उल्हास पाटील

0

प्रजासत्‍ताकदिनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
लोकशाही न्युज नेटवर्क
घर घर गोदावरी या अभियानांतर्गत आपले शेकडो डॉक्टर्स खेड्यापाड्यांमध्ये जाऊन रुग्णांची आरोग्य तपासणी करीत आहे, यामुळे केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर बर्‍हाणपूर, खंडव्यासह मध्यप्रदेशातूनही रुग्णांची पसंती आपल्या रुग्णालयास मिळत आहे. हे सर्व सोप्प नसून यामागे अनेकांचे परिश्रम आहेत. तुम्ही सर्वच आरोग्य विज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेत आहात, तर सर्वप्रथम पेशंटशी नम्रतेने वागायला शिका, प्रवेशद्वारापासूनच पेशंटला उत्‍तम वागणूक मिळायला हवी. कुठलेही यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे, परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचा कानमंत्र गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी दिला.

निमित्‍त होते २६ जानेवारी या प्रजासत्‍ताक दिनाचे. गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध आरोग्य विज्ञान शैक्षणिक संकुलांचा एकत्रितरित्या प्रजासत्‍ताक दिन गुरुवार, २६ जानेवारी रोजी परिसरात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते नारळ वाढवून ध्वजाला जन गण मन या राष्ट्रगीताद्वारे सलामी देण्यात आली. राष्ट्रगायनामुळे संपूर्ण परिसर देशभक्‍तीमय झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, डॉ.विशाखा वाघ, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.ढेकळे, डॉ.जयंत देशमुख, डॉ.कैलास वाघ, डॉ.विठ्ठल शिंदे, फिजीशियन डॉॅ.चंद्रेय्या कांते, डॉ.सी.डी.सारंग, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले, फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे डायरेक्टर शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील, हॉर्टिकल्चरचे डॉ.सतीश सावके यांची उपस्थीती होती. मान्यवरांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर प्रजासत्‍ताक दिनाविषयी प्रणव चौधरी या विद्यार्थ्याने भाषण दिले. तसेच गीतगायन व नृत्याद्वारे देशप्रेम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या आठवणी सांगून आरोग्य क्षेत्राचे समाजप्रतीचे कर्तव्य काय आणि त्यासाठी किती जबाबदारीने वागावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान उपस्थीतांना लाडूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पियूष चिंचकर, इशा टोने यांने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

या महाविद्यालयांचा सहभाग

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, स्व.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय यांनी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य, रजिस्ट्रार यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर्स तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.

चेहर्‍यावर तिरंगा तर हातात झेंडा घेवून सेल्फी

प्रजासत्‍ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर यावेळी तिरंगा काढण्यात आला होता, तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस झेंडा हातात घेऊन फोटो काढण्याचा आनंद विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, डॉक्टरांनी देखील लुटला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.