सोयगावच्या माता पिता गोशाळेतील गायीवर बिबट्याचा हल्ला

0

पिंपळगाव हरेश्वर ;- सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात माता-पिता गोशाळा येथे आज बिबट्याने गाईवर हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून गोशाळेतील कर्मचाऱयांनी बिबट्याला वेळीच हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला .

जखमी झालेल्या गायीवर डॉक्टरांच्या साह्याने उपचारकरण्यात आले. हल्ला झाल्याची माहिती वन विभाग अधिकारी तौर यांना देऊन सोयगाव येथील स्थानिक वनरक्षक सुनील हिरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .यावेळी माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था संस्थापक राजेंद्रगायकवाड, अध्यक्ष मनोज गायकवाड, संचालक दिनेश गायकवाड,सागर क्षिरसागर, स्पंदन लोहार,दगडु जाधव, संतोष चव्हाण, मोहीत जाधव, रोहित जाधव उपस्थित होते.तर निसर्ग प्रेमी विवेक वाघे व सर्पमित्र दिनेश गायकवाड यांनी परिसरातील शेतकरी यांना आवाहन करतं म्हटले कि, कि जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भरकटत असतात . ज्या परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असेल त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना कुठलीही बाधा येऊ नये.,तसेच शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असे वाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.