आंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धेत मुलांमध्ये मु.जे.कॉलेज विजयी

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आयोजित आंतर हॉकी स्पर्धा डॉ अण्णासाहेब. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,यांनी पोलिस कवायत मैदानावर दि 10 घेण्यात आल्या . स्पर्धेत एकूण मुलांचे सहा संघ होते .स्पर्धेचे उद्घाटन डॉ पी एन तायडे यांनी केले. त्याप्रसंगी RPI संतोष सोनवणे ,मनोज सुरवाडे , संतोष सुरवाडे, RSI साळुंखे , निवड समिती सदस्य डॉ चांद खान , डॉ अख्तर खान, डॉ आसिफ खान, उपस्थित होते.

हॉकी पुरुष स्पर्धेचा अंतिम स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

एम जे कॉलेज V नूतन मराठा महाविद्यालय या मध्ये झालेल्या सामन्यात एम जे कॉलेज या संघाने नूतन मराठा महाविद्यालय या संघावर 04 या गोलने विजय मिळवला

शासकीय अभियांत्रिकी V पीजी युजी जिमखाना यामध्ये झालेल्या सामन्यात पीजी /युजी जिमखाना या संघाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संघाचा 02 ने पराभव केला

के सी ई B P E D V एम जे कॉलेज यामध्ये झालेल्या सामन्यात के सी ई B P E D महाविद्यालय संघाने एम जे कॉलेज संघावर 4-2 विजय मिळवला

उपांत्यपूर्व सामना पीजी युजी जिमखाना V ईकरा महाविद्यालय या दोन्ही संघात अत्यंत चुरशीचा सामना झाला यामध्ये पेनल्टी शूटआउट मध्ये ईकरा या संघाने पीजी यूजी या संघाचा 7-8 पराभव केला.

पुरुष
प्रथम क्रमांक- के सी ई एकलव्य बीपीएड कॉलेज, जळगाव
द्वितीय क्रमांक-इकरा महाविद्यालय,
जळगाव
तृतीय क्रमांक-पीजी जिमखाना विद्यापीठ, जळगाव

प्राचार्य गौरी राणे मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिता कोल्हे यांनी केले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा अमर हटकर, डॉ प्रवीण कोल्हे, डॉ योगेश महाजन, प्रा बारी सर, उपस्थित होते.पंच म्हणून ,अकील मोहम्मद रेल्वे भुसावल,युसुफ खान, मुजफ्फर शेख, इमरान शेख, उत्कृष्ट काम केले.स्पर्धा चांगले व्हाव्यात म्हणून प्राध्यापिका छाया चिरमाडे ,श्री संजय सुरवाडे, श्री बाणाईत यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.