सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन ; एकावर कारवाई

0

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरात गांजा सेवन करीत असताना आढळून आल्याने सैय्यद नदीम सैय्यद कासीम (वय ३७, रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मेहरुण परिसरातील तांबापुरा खदानजवळ एक जण गांजा सेवन करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना शुक्रवारी दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मिळाली.

पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता सैय्यद नदीम सैय्यद कासीम हा गांजा सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याजवळून चिलम व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोकॉ किरण पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सैय्यद नदीम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.