तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

0

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या अफताब उर्फ अप्पू कलीम बेग ( वय २३, रा. समतानगर) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दि. ३१ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तरुणीला खोटे नाव सांगून तिच्यासोबत ओळख निर्माण करुन तिच्या इच्छेविरुद्ध अफताब उर्फ अप्पू कलीम बेग याने तरुणीच्या ईच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला होता. संशयित तरुणीला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तरुणीने शुक्रवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी संशयित अफताब उर्फ अप्पू बेग याला अटक केली. त्याला न्यायालयात – हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांनी दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत • पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नीलेश चौधरी यांनी बाजू मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.