जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली

0

जळगाव : – शहरातील प्रताप नगरातून तरुणाची दुचाकी लांबवल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्रताप नगरात निखील अशोक पाटील (वय २६) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. खासगी काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्कीगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.