गेमिंग कंपन्यांकडून सरकार १.५ ट्रिलयन GST वसूल करणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कमी कर भरल्याप्रकरणी आता जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय एकूण १.५ ट्रिलियन (१८ अब्ज डॉलर) कराची मागणी करण्याची शक्यता आहे. लोकप्रिय फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम ११ चालवणाऱ्या मुंबईतील स्पोर्टा टेक्नॉलॉजीजने आर्थिक वर्ष २०१८ आणि २०१९ साठी डीजीजीआयच्या कारणे दाखवा नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

ड्रीम ११ टॉप ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची बाजू मांडणाऱ्या तीन वरिष्ठ वकिलांनी सांगितले की, डीजीजीआय उद्योगातील विविध गेमिंग कंपन्यांना पाठविण्यासाठी नोटिसा तयार करत आहे, ज्यात गेम्स 24×7, हेड डिजिटल वर्क्स, जंगली गेम्स, बाजी गेम्स आणि मोबाइल प्रीमियर लीग चा समावेश आहे. येत्या आठवडय़ात डीजीजीआयकडून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मागणीच्या नोटिसा मिळण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांच्या यादीत विनझोसारख्या छोट्या कंपन्यांचाही समावेश आहे.

ड्रीम 11 कंपनी आर्थिक वर्ष 20 ते 22 साठी नोटीस प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यात डीजीजीआयकडून कंपाउंडिंग टॅक्स क्लेम होण्याची शक्यता आहे. यामध्ये शेवटच्या वर्षाचा कर दावा ४०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, या वर्षांसाठी एकूण कराचा दावा ५५,००० कोटी रुपये आहे,  अशी माहिती एका वकिलाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.