रामेश्वर कॉलनीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला एका अज्ञात व्यक्तीने 27 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुठलेतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.