जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव : – एका ५३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरातील उमर कॉलनीत शनिवारी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुनवराबी शेख अशरफ (वय ५३) असे मयत महिलेचे नाव आहे.

शहरातील उमर कॉलनीत मुनवराबी शेख अशरफ या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने त्यांनी गळफास घेवून मृत्यूला कवटाळले . ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक फौजदार संजय झाल्टे यांनी घटनास्थळी धाव त्यानंतर पंचनामा घेतली. करुन मुनवराबी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.