जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सकाळचे प्रसन्न वातावरण… आई-वडिलांसोबत निघालेली मुलं.. तोरणं, फुलांनी सजवलेले स्कुलचे वर्ग, रांगोळ्यांची आरास, औक्षण करणारे शिक्षकवृंद, गुलाबपुष्प तसेच चॉकलेट्सचे वाटप हे सर्व भारावलेले वातारण होते जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमधील रंगलेल्या पहिल्या दिवसाचे. आनंद, उत्साह, कुतूहल अशा वातावरणात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलची पहिली घंटा वाजली अन् ‘बॅक टू स्कूल’ साजरे झाले.

शाळेची वाट अन् उत्साहाचा थाट

शाळेचा पहिला दिवस असल्याने काही विद्यार्थी स्कूलच्या व्हॅनने व काही आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहात स्कुलमध्ये दाखल झाले होते. कार्टुनचे दफ्तर, नवीन वॉटरबॉटल अशा साहित्यांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्कूलमध्ये उपस्थित झाले होते. सुटीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर बुधवारी स्कुलच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. यानंतर स्कूलमध्ये रेन डान्स, घोड्याची सवारी व गुलाबपुष्प देवून चिमुकल्यांचं स्वागत करण्यात आले.

दर्जेदार शिक्षण देणारे रायसोनी स्कुल

मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुयोग्य अभ्यासक्रम, गुणवत्ता असलेले निष्ठावंत शिक्षक, आदर्श पायाभुत सुविधा, सुरक्षीत बसेस सेवा इत्यादी सर्व सुविधा रायसोनी इस्टीट्युटने सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये प्ले ग्रुप ते आठवी या वर्गासाठी निर्माण करुन दिल्या आहेत. शिक्षकांना ट्रेनिंग पोग्राम स्वतंत्र दिले आहेत तसेच स्कूलमधील प्रत्येक वर्गाचे सुक्ष्म नियोजन केले आहे. राज्यात आणि देशात रायसोनी इस्टीट्युटला सर्वोत्तम मानले जाते. तो दर्जा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये देखील कायम ठेवला जाईल, असे मत रायसोनी पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये तंत्रज्ञानावर भर

तंत्रज्ञानाचा विचार करता सर्व वर्ग डिजिटल इंटरएक्टीव्ह स्क्रीन केले आहेत, विज्युलाइस सुसज्ज आहेत. रायसोनी स्कुलमध्ये कंप्युटर लॅब, लायब्रेरीबरोबर, संगीत, नृत्य, नाटक, योगा, स्केटींग यासमवेतच क्रिडा क्षेत्रातील सर्व स्पर्धा आणि वेगवेगळया प्रकारांमध्ये विद्यार्थी भाग घेतात. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना अधिकाधिक विविध खेळ किंवा विषय शिकवले जातात.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव

आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये तयार करण्यात आला आहे. हा तलाव १३ बाय २६ मीटरचा असून हाफ ऑलिम्पिकच्या धर्तीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय या ठिकाणी बाथरूम, शॉवर, चेजिंग रूम, अत्याधुनिक फिल्टरची सुविधा बसवण्यात आली आहे. या सर्व सुविधांमुळे हा पुल पालकांमध्ये अधिक चर्चेत असून  शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने रायसोनी पब्लिक स्कुल अग्रेसर आहे.

रायसोनी स्कूलमधील इनोव्हेंशन सेंटर

गुणवत्ता राबविण्यासाठी रायसोनी स्कूलमधील इनोव्हेंशन सेंटर हे प्रत्येक विषयासाठी लेसनप्लान बनवते. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांच्या वैयक्तिक विकासासाठी शिक्षण वर्गाचे आयोजन करते. शिक्षक हा शाळेचा आत्मा असल्याने रायसोनी स्कुलमध्ये  गुणवत्ता प्रत व निष्ठावंत शिक्षक नियुक्त केले आहेत. त्यांना आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण देऊन शिक्षकांचे कौशल्य वाढविण्याचे काम रायसोनी इनोव्हेंशन सेंटर करते. त्यासाठी विविध कार्यशाळाही घेतल्या जातात.

जर्मन,जापनीज व फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण

जर्मन, जापनीज, फ्रान्स या सर्व देशांत शिकण्यासाठी तेथील भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. या भाषा केंब्रीज युनिवर्सिटीशी संलग्न असून जळगाव शहरातील अनेक विद्यार्थी माध्यमिक शिक्षणानंतर  स्वतःहून परदेशात शिकत असले तरी बहुतेक विध्यार्थी भाषाज्ञानामुळे मागे पडतात. याच बाबीचा मागोवा घेत शहरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये विध्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात इलेक्टीव विषय देत जर्मन, जपानी, फ्रेंच व स्पेनिश भाषेचे वर्ग सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष

विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेवुन सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस, मेडिकल कीट, अग्निशमन साधने, स्त्रीपरिचारिका तसेच व्हॅनची वेग मर्यादा ३० कि.मी.साठी स्पीड गवर्नर अशा सोईनी सुसज्ज अशी व्हॅन सेवा उपलब्ध रायसोनी स्कुलने उपलब्ध केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.