भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ येथील ‘श्री रिदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’ चे संचालक डॉ. नितीन रामचंद्र पाटील (M.B.B.S, DNB,IDCCM) यांचे गुरुवार दि. 16 रोजी निधन झाले.
सकाळी डॉ. नितीन पाटील हे फोन उचलत नसल्याने हॉस्पिटलचे कर्मचारी पाटील यांच्या मोहित नगर येथील घरी गेले. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोकला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयास ही माहिती दिली. हॉस्पिटलचे सहकारी डॉक्टर यांनी डॉ. नितीन पाटील यांचे निवासस्थान गाठले. यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
दरम्यान डॉ. नितीन पाटील हे बेडरूम मधील बेडच्या खाली पालथ्या अवस्थेत आढळून आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ते निष्प्राण झाले असल्याचे समजले. डॉ. नितीन पाटील यांच्या तोंडातून व नाकातून पिवळसर द्रव बाहेर आलेला होता तसेच त्यांच्या ओठातुन रक्त आलेले होते. त्यांना अनेक वर्षांपासून मीर्गीचा त्रास होत होता. त्यांना मिर्गीचा झटका आला असण्याची शक्यता असू शकते.
ते नुकतेच सहकुटुंब काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. त्यांची पत्नी काही कामानिमित्त माहेरी पुण्यास गेलेल्या आहेत. तर त्यांचे वडील व भाऊ हैद्राबाद येथे आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक लहान मुलगी व भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा दि. 17 जून रोजी निघणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर नितीन पाटील भगवान उनकी आत्मा को शांति दे
अत्यंत दुर्दैवी घटना. भावपूर्ण श्रद्धांजली