सावधान.. मोमोज खाताय ! मोमोज खाऊन ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खाद्यप्रमींच्या यादीमध्ये मोमोजचे स्थान प्रथम क्रमांकावर आहे. तसेच आजकाल बाजारपेठेत विविध प्रकारचे मोमोज दिसले तर पाहून तोंडाला पानी सुटणारचं.. मग काय खाण्याचा मोह काही आवरला जाणार नाही. जर तुम्हीही मोमोज प्रेमी असाल तर ही बातमी नक्की वाचा..

मोमोज खाणाऱ्यांसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच AIIMS ने महत्वाचा सल्ला आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. कारण मोमोज खाणं चांगलंच तुमच्या जीवावर बेतू शकतं.

मोमोज खाल्ल्यानंतर दिल्ली येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. त्यानंतर एम्स कडून महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर श्वास गुदमरू शकतो. मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे मोमोज खाताना विशेष काळजी घ्या, असे एम्सच्या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे.

AIIMS ने दिलेल्या सूचना

मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर श्वास गुदमरू शकतो. यामुळे मृत्यूचा धोका संभवतो. मोमोज हे स्ट्रीटफूड आहे. त्यामुळे हे बनवताना स्वच्छतेची तितकीशी काळजी घेतली जात नाही. मोमोज मैद्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे स्वादुपिंडाशी संबंधित आजार उद्भवतात. त्याचा इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो.

दरम्यान मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. त्याच्या श्वसनमार्गामध्ये मोमोज अडकलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मोमोजमुळे त्याचा गुदमरला आणि या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशी माहिती समोर आली आहे. म्हणून तुम्हीही मोमोज प्रेमी असाल तर नक्की काळजी घ्या..

Leave A Reply

Your email address will not be published.