रायसोनी महाविद्यालयातर्फे निराश्रीत बालक व महिलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा, एमआयडीसी, रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरातील गरजू कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू आणत युवक विद्यार्थ्यानी त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिवाळी निमित्त कपडे व फराळ वाटप करण्यात येतो.

आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून व यंदाच्या दिवाळीत या लहानग्यांना चांगले कपडे मिळावे आणि ही दिवाळी त्यांना आनंदात साजरी करता यावी म्हणून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने गरजू कुटुंबीयांना कपडे व फराळ वाटप करण्यात आले. यावेळी नवीन कपडे व फराळ भेटल्यावर या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. या सामाजिक कार्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटचे प्रेसिडेंट गणेश पाटील व सचिव लवली मित्तल यासह कुणाल जैन, राजेश्वरी पवार, योगिता दुसाने, सानिका सपकाळे, तमन्ना तडवी, रोशनी जैन, चेतना काकडे, वैष्णवी घुगे, प्रेम शर्मा, कुशाल अग्रवाल, साक्षी जयस्वाल, सुरेश पाटील, आकाश पात्रा, जान्हवी चितळे, सेजल बाहेती, प्रियंका शर्मा, सुजल परदेशी, महेश सोलंकी, दिव्या जैन, अक्षयकुमार घुगे या विद्यार्थ्यानी तसेच महाविद्यालयातील प्रा. श्रिया कोगटा यांनी विशेष योगदान देत या उपक्रमाचे समन्वय साधले. तर या सामाजिक कार्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.