डॉक्टर दाम्पत्याची तीन लाखात ऑनलाईन फसवणूक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमच्या घटना आपण पाहत असतो. यामुळे अनेकांची लाखो रुपयात फसवणूक होत असते. म्हणून प्रशासनाकडून नागरिकांनी नेहमी सावध करत अशा गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन केले जाते. अशाच प्रकारे जळगाव शहरातील डॉक्टर दाम्पत्याला ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याची बतावणी करून वीज बिल भरण्याच्या नावाखाली या डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे भुसावळ शहरातील एका मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटलचे डॉक्टर आहे. २३ आणि २४ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसीटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली.

दरम्यान समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या खात्यातून सुमारे ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धाव घेवून रोहित नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.