व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची पावणेबारा लाखांत फसवणूक

0

जळगाव : – सोशल मीडियावरील शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता प्रभाकर घोंगडे (४०, रा. धुळे) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

नोकरी करणाऱ्या संगीता घोंगडे यांना १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान वेळो‌वेळी राजा ठाकूर व पट्टेश रिमाह नाव सांगणाऱ्या दोघांनी व्हाटस् अप व कुशल, ज्योती, चंदेर असे नाव सांगणाऱ्यांनी टेलिग्राम या सोशल मीडियावर संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क दिले. त्यादरम्यान घोंडगे यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ४० हजार ५५० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्या पैकी ६८ हजार १२७ रुपये महिलेला परत दिले. त्यानंतर मात्र उर्वरित उर्वरित रक्कम परत न देता १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संगीता घोंगडे यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.