सुरेशदादांना न्यूमोनिया, एअर अम्ब्युलन्सने मुंबईला प्रस्थान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी मंत्री सुरेशदादा जैन (Former Minister Sureshdada Jain) यांना न्यूमोनियाची (Pneumonia)  लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास सुरु झाला. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून एअर अम्ब्युलन्सद्वारे मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) हलविण्यात येणार आहे. त्यांची मुलगी मीनाक्षी आणि मुलगा राजेश यांनी दादांसोबत विशेष विमानाने पाच वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईला प्रस्थान केले.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना घरकूल प्रकरणात न्यायालयाकडून नियमीत जामीन मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यातच दादा जळगावात आले होते. यावेळी जळगावात त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तसेच दादांच्या भेटीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, समर्थकांची रीघ लागली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.