लष्कराच्या गाडीला भीषण अपघात; 16 जवान शहीद

0

सिक्कीम, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिक्किममध्ये (Sikkim) लष्कराच्या गाडीला मोठा अपघात झाल्याचे वृत्त आहे. उत्तर सिक्किममध्ये भीषण अपघात झाला आहे. भारतीय सेनेची (Indian Army) एक बस खोल दरीत कोसळली. यात 16 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचा हा ट्रक सकाळी चतनहून थांगूच्या दिशेने निघाला होता. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक ट्रक तीव्र उतारावरून घसरला. यात गाडीतील 16 जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अपघातातील चार जखमी जवानांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले. या रस्ते अपघातात तीन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.