मधुमेह, रक्तदाब तपासणी व उपचार शिबिर संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत तथा शिवालय स्पाईन & न्यूरो यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव शहरातील हरी विठ्ठलनगर येथे तीन दिवसीय मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबीराचा स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला.

या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे दुर्गेश निंबाळकर जळगाव यांनी उचीत आहार उचीत उपचाराने मधुमेह कशा प्रकारे कमी होऊ शकतो. याबद्दल मार्गदर्शन केले. जळगाव शहरातील या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्वास्थ्य प्रचारक दुर्गेश निंबाळकर यांनी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान समन्वयक म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.