जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा चौधरी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक यांनी क्रीडांगणाचे पूजन करून या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन केले. त्यांनतर स्पर्धांना सुरुवात झाली.
यात रस्सीखेच, 200 मीटर धावणे, गोणपाट शर्यत, अडथळा शर्यत, रांगोळी स्पर्धा, नेम धरणे, फुगा फोडणे, एका मिनिटात गाजर तोडणे, रिंगमध्ये चेंडू घेऊन चालणे, संगीत खुर्ची, क्रिकेट मॅच, दोरी उड्या, कप बॅलेन्स इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा सप्ताहाची सांगता आनंद मेळयाने करण्यात आली. यात विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान यावे, यासाठी विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवून ते विकण्याचा आनंद मिळावा या हेतूने आनंद मेळयाचे आयोजन करण्यात आले होते.
अशा प्रकारे क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे क्रीडा प्रमुख प्रवीण वायकोळे व उमेश चौधरी यांनी नियोजन केले होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वैशाली राठोड, शारदा धांडे, योगिता तळले, नीलिमा वारके, स्नेहल ठाकूर व ज्योती इंगळे या सर्वांचे सहकार्य मिळाले अशाप्रकारे क्रीडा सप्ताह आनंदाने पार पडला.