tor thodesen gift the good witch gift dvd sephora glossy gloss discontinued best deals gift cards
Thursday, December 1, 2022

वन विभागाची मोठी कारवाई; तब्बल इतके सागवान लाकूड जप्त…

- Advertisement -

 

- Advertisement -

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

यावल व रावेर वन विभागाच्या संयुक्त कारवाईत सावदा येथे बांधकामा ठिकाणी दोन लाख रुपयांचे सागवान लाकूड आढळले. यावल व रावेर वनविभागाच्या वृक्षतोड माफीयांविरूद्ध सुरू असलेल्या मोहीमेला यश आले आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे वन विभागाच्या धडाकेबाज कारवाईत सुमारे दोन लाख रूपयांचे सागवान वृक्षाचे लाकूड जप्त करण्यात आले असून, या कारवाई मुळे सातपुडाजंगलातील मौल्यवान वृक्षांची अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वनविभागाच्या सुत्रांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दि. २५ ऑगस्ट २o२२ रोजी धुळे वनसंरक्षक डिंगबर पगार, पद्मनाभ एच एस (उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव), प्रथमेश हाडपे (सहाय्यक वनसंरक्षक यावल), यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यावल पुर्व विभाग आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर प्रादेशिक यांनी संयुक्तरीत्या मौजे सावदा नगरपालिका  हद्दीतील शिवगंगा नगर मधील गणेश कोळी यांच्या मालकी चे बांधकाम चालू असलेल्या घरात अवैधरित्या विनापरवाना, विनानिर्गत पासेस, विनाशिक्काचे मौल्यवान साग इमारती चौरस लाकूड नग-११८, घ.मी-१.७४१,किंमत १,५६,०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

चौकशी दरम्यान लाकूड मालक आरोपी नंदुकिशोर अरुण चोपडे रा.निंभोरा स्टेशन, रावेर यांनी नविन घरबांधणी व फर्निचर साठी व अवैध विक्रीकरण्यासाठी साग लाकडे अवैध वाहतुक करुन घरा मध्ये दडवून ठेवले असल्याचे आढळून आले. सदर कारवाईत वनक्षेत्र रावेर मधील वनपाल रावेर यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अन्वये प्रथम रिपोर्ट क्रमांक ०५/२०२२ चा वनगुन्हा नोंद करण्यात आला असुन. सदरील सागवान लाकूड जप्त करून पुढील तपास चालू आहे.

या कारवाईत विक्रम पदमोर (वनपरिक्षेत्र अधिकारी यावल ), अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनपाल- रवींद्र सोनवणे, वनरक्षक- गोवर्धन डोंगरे, कृष्णा शेळके, भैय्यासाहेब गायकवाड,  संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, युवराज मराठे, श्रीमती आयशा पिंजारी, श्रीमती कल्पना पाटील, श्रीमती सविता वाघ, श्रीमती अरुणा ढेपले, वाहन चालक चव्हाण, विनोद पाटील आणि अधिसंख्य वनमजूर यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या