वन विभागाची कारवाई; अकार्यक्षम कर्मचारी निलंबित…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पश्चिम वन विभागातील सातपुडा वाघझीरा वनक्षेत्रात मौल्यवान सागवानची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढली होती. आणि ती रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या वनपाल, वनसंरक्षक व एक वन मजुरास निलंबीत करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, यावलच्या सातपुडा जंगलातील पश्चिम वनविभागाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या दोन महिन्यापासून वृक्षतोड रोखण्यात अकार्यक्षम ठरल्याच्या कारणावरून वाघझिरा बीटचे वनपाल वनरक्षक व एका वन मजुरास अशा तीन जणांना वनविभागाने निलंबित केले आहे. वाघझिरा वन क्षेत्रातील वृक्षतोडी संदर्भात मागील पंधरवाडयात विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातुन माहीती देण्यात आली होती.

यावलच्या सातपुडा जंगलातील वन विभागातील कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यापासून सागवान वृक्षासह इतर मौल्यवान वृक्षांची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तसेच सागवान लाकडाचा अवैध व्यवसाय वन, विभागाच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याची तालुक्यात चर्चा होत आहे.

यामुळे, वनविभागाने वाघझिरा बिट चे वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी वाय नलावडे आणि वन मजूर काशिनाथ बेलदार अशा तिघांवर तडकाफडकी निलंबनांची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राचे वन परिक्षेत्रपाल एस.टी. भिलावे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.