जळगावच्या राजश्री पाटील यांना राष्ट्रपती दौप्रदी मुर्म यांच्या हस्ते “फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार”…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शेंदुर्णी ता. जामनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य खात्यातील देदीप्यमान कामगिरी बद्दल देण्यात येणारा “फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार” (“Florence Nightingale National Award”) दि. ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राजश्री पाटील या मागील आठ वर्षापासून शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत तसेच त्यांची पाचोरा तालुक्यातील कळमसरा, लोहटार, लोहारा येथे देखील सेवा झालेली आहे. त्यांचे मूळ गाव भिलखेडा ता. जामनेर हे आहे. व त्यांचे माहेर पहूर ता. जामनेर येथील आहे. राजश्री पाटील यांना मिळालेला बहुमान हा जळगाव जिल्हा तसेच जामनेर तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. राजश्री पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.