जळगावात तरुणाचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाबाहेर निघालेल्या तरुणाने सोबत आणलेल्या बाटलीतून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा धक्केदायक प्रकार गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून अनंता अशोक उमाळे (३०,रा.वरणगाव) या असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून वरणगाव येथील अनंता उमाळे हा तरुण कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा भुसावळातील एका तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, कौटूंबिक वादातून सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत असल्याने आणि त्याच्या पत्नीने पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील महिला दक्षता समितीकडे तक्रार केली आहे. आज उमाळे हा कुटुंबियांसह महिला दक्षता समिती येथे तारखेवर आले होते. समितीकडून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पती-पत्नीमध्ये तडजोड न झाल्यामुळे त्यांच्याकडून लेखी लिहून समितीने दोघांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला . यावेळी अनंत याने मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणतो असे वडीलांना सांगून कार्यालयाबाहेर बाहेर जावू लागला. त्याचवेळी एका बाटलीत आणलेले फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच्या कुटूंबियांसह इतर पोलिस कर्मचारी व नागरिकांनी त्याला उचलून रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पत्नीला नांदविण्यास तयार होता, तिने नकार दिल्यानंतर त्याने कार्यालयाबाहेर येवून फिनाईल पिल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.