प्रवाशाला लुटणाऱ्या एका संशयिताला अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

रिक्षाचालकासह चौघांनी प्रवाशाला निवांतस्थळी नेऊन मारहाण करून १० हजार रूपये लुटल्याची घटना नाशिक येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळ ९ एप्रिल रोजी घडली होती. या गुन्ह्यातील एका संशयिताला जळगाव शहर पोलिसांनी गुरूवारी गेंदालाल मिल येथून अटक केली . दिनेश सुनील सोनवणे (रा.सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी १० एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तर पोलिसांनी रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (३४, रा.पवारवाडी, ता. मालेगाव) याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यात दिनेश सोनवणे (रा. सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल, जळगाव), शेख जावेद सलीम, शेख मुस्तफा (दोन्हीरा. सुरत) या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. ही माहिती नाशिक पोलिसांनी शहर पोलिसांना दिली असल्याने गुरूवारी दिनेश हा गेंदालाल मिल येथे आला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील तेजस मराठे व योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी त्याच्या मुसक्या आवळून पकडून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. . ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.