५ जिवंत काडतुसे आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

0

अडावद , ता. चोपडा

५ जिवंत काडतुसे आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्या मध्यप्रदेशातील तरुणाला अटक करण्यात आली असून हि कारवाई बुधवारी सायंकाळी उनपदेवनजीक अडावद ता. चोपडा पोलिसांनी केली.

आझादसिंग सुदानसिंग भाटीया (२८, रा. उमर्टी जि.बडवानी, मध्यप्रदेश ) असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल व मोबाईलसह ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून एक जण देशी कट्टा घेवून विक्री करण्यासाठी चोपडा तालुक्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा, फौजदार चंद्रकांत पाटील, सहाय्यक फौजदार शरिफ तडवी, कैलास तायडे, कादिर शेख, जयदीप राजपुत, सुनिल तायडे, सतिष भोई, विनोद धनगर, प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.