तरुणाच्या डोक्यात फरशी मारून दुखापत

0

जळगाव : घरासमोर बसलेल्या शाम शरद साळुंखे (वय २३) या तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १३ मार्च रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास शिरसोली नाका जूना मेहरुण रोड परिसरात घडली. याप्रकरणी शाम सुभाष तांबे रा. रामेश्वर कॉलनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली नाका परिसरातील जूना मेहरुण रोड परिसरात शाम शरद साळुंखे हा तरुण वास्तव्यास असून तो वेल्डींग काम करुन आपला उदनिर्वाह करतो. दि. १३ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तो घराजवळ बसलेला असतांना शाम सुभाष तांबे हा त्याठिकाणी आला. त्याने शाम साळुंखे याला शिवीगाळ करीत बाजूला पडलेला फरशीचा तुकडा उचलून तो शाम साळुंखे याच्या डोक्यात टाकत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शाम तांबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.