खडकदेवळा येथे गावठी हातभट्टी दारु उद्धवस्त

0

पाचोरा ;- पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक अशोक पवार हे अॅक्शन मोडवर येत तालुक्यात सुरु असलेल्या गावठी दारू हातभट्ट्यांवर धाड सत्र सुरू केले आहे.

पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे अवैधरित्या गावठी दारू हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर १४ मार्च रोजी अशोक पवार यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे, पोलीस नाईक हरीश कुमार अहिरे यांचे पथक नियुक्त करुन खडकदेवळा ता. पाचोरा येथील गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

तालुक्यासह शहरातील रहदारीस कुठलाही अडथळा निर्माण होवु नये म्हणुन पोलिस निरीक्षक अशोक पवार हे स्वत: पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्यासह दररोज सायंकाळी पाचोरा शहरातील मुख्य चौकात जावुन शिस्त लावण्याची कामगिरी देखील बजावत आहे. तसेच तालुक्यासह परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारु हातभट्ट्यांवर धाडसत्र सुरुच ठेवणार असल्याचेही पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.