शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेती आणि शेतकरी वाचविणे काळाची गरज.

शिरपूर:- तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी दिवसेंदिवस शेती करताना शेतकऱ्यांची दमछाक होत असताना दिसत आहे,शेतीमालाला नसलेला भाव त्यातच वाढलेली मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत,तसेच डिझेलची भाववाढ असल्याने ट्रॅक्टरच्या मशागतीने शेती परवडत नाही,त्यापेक्षा शेती सोडून दिलेलीच बरी अशी अवस्था शेतकऱ्याची झाल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी नवनवीन प्रयोग करून शेती पिकवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो,त्यासाठी जीव ओतून तो ते दिवस-रात्र शेतीकडे लक्ष देतो,पहिल्या आणि आताच्या शेत मजुरांमध्ये फरक पडला आहे,आधी रोजंदारी कमी असायची शेतकरी न बोलवता शेतात वेळेवर मजूर वायचा पण आता उलट परिस्थिती आहे.मजुरांना आणायला त्याच्या घरी वाहन पाठवावे लागते.आणि मजुरी ५००  रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी जेरीस आला आहे.तर वाढत्या भाववाढीमुळे पहिल्यासारखी ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नाही,बागायतदाराला मजूर होण्याची वेळ आल्याने शेतकरी सोडून दिलेली बरी अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.

खर्च लाखात उत्पन्न हजारात…

शेतीत मेहनत केली तर पैसा मिळतो काही वर्षापासून शेतीला कायम फटका बसत आहे,खर्च लाखात होऊन उत्पन्न हजारात वाढला लागलेच  मजुरी आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही,दिवसाला ५०० रुपये तरी मजूर मिळेना,कामावर यायला आणि परत सोडायला गाडी दिवसाला पाचशे रुपये मजुरी देऊनही शेती कामाला मजुरी मिळत नाहीत एवढी कठीण परिस्थिती शेतकरी वर्गाची झाली असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. मग शेती करावी तरी कोणत्या आशेवर ?

:-शेतकरी नेते पियुष रेवतकर.

अल्प भूधारकांची अडचण..

जमिनीचे क्षेत्र कमी असलेल्या शेतकऱ्याचे तर मोठ्या प्रमाणावर आहे.

एक तर शेती थोडी आणि त्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे अल्प भूधारकांची अडचण निर्माण झाली आहे.

वर्षभरात ट्रॅक्‍टर मशागत दुप्पट महाग

१. मागील वर्षी ट्रॅक्टर आणि शेती करणे परवडत होती कारण बैलजोडीची मेहनत आणि ट्रॅक्टर थोडाफार फरक पडायचा.

२. पण आता डिझेलचे दर वाढल्याने १४,०० रुपये प्रती एकर मशागतीवरून २,००० हजार रुपये प्रति एकर खर्च होऊ लागला आहे त्यामुळे ट्रॅक्टरचे मशागत महाग झाली आहे.

इंधन दर वाढले आम्ही काय करणार?

१.मागच्या वर्षी डिझेल कमी भावाने मिळायचे त्यामुळे शेती मशागत देखील कमी पैशात व्हायची,आता डिझेल भाव वाढ झाली म्हणून शेती मशागतीचे भाव वाढले,त्याला आम्ही तरी काय करावे? आम्हाला परवडत नाही.

:-लेकराज गुडदे (ट्रॅक्टर चालक,मालक)

२.दिवसेंदिवस डिझेल भाव वाढ होतेय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे शेतीची मशागत महाग वाटतेय,पण आम्हाला परवडत नाही म्हणून तरी काय करणार?

:-शेषराव गुडदे (ट्रॅक्टर चालक)

Leave A Reply

Your email address will not be published.