सोने- चांदीच्या दरात तेजी कायम ! तपासा आजचे जळगावातील नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून सोन्याचे दर वधारले आहेत. तरी देखील सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. सराफा बाजारात ग्राहकांची लगबग सुरु आहे. दरम्यान चांदीची मागणी देखील वाढली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्यापासून सोने चांदीचे दर अस्थिर होते. मात्र आता सोने चांदीच्या दरात हालचाली होत आहेत. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील सोने तेजीत होती. आज मंगळवारी सुद्धा सोन्याच्या दरात तेजी कायम आहे.

काल दि. 18 एप्रिल रोजी सोमवारच्या दिवशी सोन्याचा भाव 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागला, तर चांदी 793 रुपयांनी वाढली. एवढी वाढ होऊनही सोने 2597 रुपयांनी तर चांदी 9871 रुपयांनी स्वस्त होत आहे. सोमवारी सोने 383 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 53603 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.
त्याचवेळी चांदी 793 रुपयांनी महागून 70109 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

दरम्यान आज दि. 19 एप्रिल रोजी जळगावातील सोन्याचे दर 54700 रुपये आहे तर चांदीचे दर 72871 रुपये आहेत. नाशिकमध्ये सोन्याचे दर 54915 आणि चांदीचे दर 72736 रुपये आहेत. तसेच औरंगाबादमध्ये सोन्याचे दर 54837 रुपये आणि चांदीचे दर 73065 रुपये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.