मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध, फडणवीसांचं मोठं वक्तव्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केलाय. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  शरद पवारांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, काहीही झालं तरी चालेल. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचे फडणवीस म्हणाले.

तसेच फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता आहे. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असतात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.