एक्झिट पोलच्या प्रकाशन, प्रक्षेपणावर बंदी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणारी लोकसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल प्रसारित करण्यास किंवा प्रकाशित करण्यास मनाई केली आहे.

या पार्श्वभूमीवर, आयोगाने निवडणुकीच्या काळात निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दाखवण्यास बंदी घातली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे. राज्यात गेल्या महिन्यात 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलच्या प्रकाशन, प्रक्षेपणावर बंदी लागू राहील.  त्याचप्रमाणे, निवडणूक आयोगाने एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे की प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या 48 तास आधी ओपिनियन पोल किंवा इतर मतदान सर्वेक्षणांचे निकाल प्रकाशित किंवा प्रसारित करण्यावर देखील बंदी असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.