एरंडोल येथे पोलिसांची कारवाई, २ बैलांसह ४ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त..

0

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क

धरणगाव हाय-वे वर ट्रॅफिक ड्युटी करीत असतांना पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व जवान सिंग राजपूत यांनी ३५ हजार रूपये किमतीच्या २ बैलांची विनापरवाना अवैध वाहतुक करणाऱ्या मारुती सुपरकॅरी गाडीला मंगळवारी १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. (एम.एच.१९ सी.एक्स.०५७८) या क्रमांकाच्या मारुती सुपर कॅरी गाडीत २ बैलांना विनापरवाना धरणावकडून आणले जात असताना आढळली. यावेळी हाय-वे चौफुलीवर असलेले पोलिस कर्मचारी संदीप पाटील व जवान सिंग राजपूत यांनी सदरील वाहनास रंगेहाथ पकडले.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग ६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५अ (१)प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१) अ, क, ई,फ, ह, आय, व प्राण्यांचे परिवहन नियम१९७८(४७,४८,४९) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. वाहनचालक दिपक शिवाजी पाटील रा.गंगापुरी ता.धरणगाव व प्रदीप सुभाष धनगर रा.धनगर गल्ली, धरणगाव या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ अनिल बबनराव पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.