पार्किंग लोकेशन अन् व्हॉईस असिस्टंस सोबत TVS ची दमदार बाईक लाँच !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीव्हीएसने मोटोसोल २०२३ या कार्यक्रमात आपल्या Apache RTR गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं. यामध्ये कित्येक मेकॅनिकल अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहे. ही बाईक एकाच कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4V या बाईकमध्ये 160cc सिंगल सिलिंडर एअर/ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 16.2 bhp टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

हायटेक फीचर्स

या बाइकमध्ये व्हॉइस असिस्टंट फिचर देण्यात आलं आहे. युजर आपला स्मार्टफोन ब्लूटूथच्या मदतीने बाईकशी कनेक्ट करू शकेल. याच्या मदतीने काही फीचर्स कंट्रोल कारण सोपं होणार आहे. या बाईकमध्ये कॉलर आयडी, SMS नोटिफिकेशन, नेव्हिगेशन असिस्ट, सर्व्हिस बुकिंग असे फीचर्सही देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी या बाईकमध्ये क्रॅश अलर्ट आणि लास्ट पार्किंग लोकेशन ट्रॅकर देखील देण्यात आलेला आहे. यात ड्युअल चॅनल एबीएस आणि तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे.

TVS Apache RTR 160 4V गाडीच्या नवीन व्हेरियंटची किंमत 1.35 एवढी आहे. याची बुकिंग सर्व टीव्हीएस शोरुमवर सुरु झाली असून, पुढील वर्षापासून डिलिव्हरी सुरु करण्यात येईल. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील हीरो एक्स्ट्रीम 160R आणि होंडा CB हॉर्नेट 2.0 या गाड्यांना टक्कर देईल असं म्हटलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.