एरंडोलचे माजी नगराध्यक्ष डॉ सुरेश पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश….

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आज १९ सप्टेंबर रोजी मुबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष खा. सूनील तटकरे यांच्या हस्ते, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुरेश पाटील (माजी नगराध्यक्ष एरंडोल) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गटात) प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, संजय बोरगे, अमित पाटील, रमेश पाटील, अरविंद मानकरी, रविंद्र पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. भविष्यात एरंडोल मतदार संघात व शहरात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करत तालुक्यात व शहरात संघटन वाढीसाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.