Monday, August 15, 2022

पापड विक्रीसाठी जातांना भीषण अपघात; सासू- जावईसह एक ठार,२ जखमी

- Advertisement -

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

येथून मंगळवारी मध्यरात्री पापड-कुरडया,गव्हले इ. विक्रीसाठी ५ जण जालना येथे जाण्यास निघाले. सिल्लोड येथे त्यांनी भल्यापहाटे चहा घेतला. राञी उशिर झाल्याने भोकरदन नजिक रिकाम्या जागेत पिकअप गाडी उभी करून मुक्कामास थांबले. सकाळी जालन्याकडे जाण्यासाठी निघाले असता सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाणेगाव (पाटी) जवळ एम. एच. ४० ए. के. ५१५६ या क्रमांकाची ट्रक व पिकअप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.

- Advertisement -

- Advertisement -

या अपघातात एरंडोल येथील कल्पनाबाई भरत पाटील (वय ४७, रा. अमळनेर दरवाजा परीसर,एरंडोल) व रामदास रामरतन पाटील (वय ४०, रा. बोरगाव ता. धरणगाव) हे दोघे सासू-जावई जागीच ठार झाले तर कल्पना गोविंद ठाकूर (वय ४५, रा. अमळनेर दरवाजा,एरंडोल) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सचिन सुकलाल पाटील (वय ४०) व भारत पाटील (वय ५५ रा. अमळनेर दरवाजा परीसर) हे दोघे जखमी झाले. या घटनेमुळे एरंडोल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

एम.एच.१९ सी.वाय.१०९१ क्रमांकाच्या पिकअप गाडीने कुरडई-पापड-गव्हले आदी विक्रीसाठी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एरंडोल येथुन जालना जाण्यासाठी निघाले. वाटेवर सिल्लोड येथे त्यांनी चहापान घेतले. भोकरदन नजिक रिकाम्या जागेत पिकअप गाडी उभी करून ते मुक्कामास थांबले.

सकाळी लवकर जालना येथे जाण्यासाठी निघाले असता बाणेगाव( पाटी) जवळ समोरून येणारी ट्रक व पिकअप गाडी यांचा अपघात झाला. यात दोन व एक पुरूष ठार झाले व दोन जण जखमी झाले. जखमींवर जालना येथे उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृत दोन्ही महीला व दोघे जखमी हे एरंडोल येथील अमळनेर दरवाजा भागातील रहीवासी आहेत.

दरम्यान सदर पिकअप गाडीचा मालक व चालक सचिन पाटील हा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी पापड-गव्हले व कुरडया विकण्यासाठी एरंडोल येथील काही सर्वसामान्य माणसे बाहेरगावी दूरवर जातात.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या