शहरात एकता दौड रॅली; जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दाखवला हिरवा झेंडा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

३१ ऑक्टोबर या दिवशी माजी उपपंतप्रधान तसेच माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती असल्याने यानिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. याअनुषंगाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून ते छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा (कोर्ट चौक) ते नवीन बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पर्यंत एकता दौड रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल,(Collector Aman Mittal) महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) तसेच मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण  करून अभिवादन केले. तसेच एकता दौड रॅलीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. यावेळी क्रीडा संकुलाचे क्रीडा अधिकारी, कर्मचारी स्टाफ तसेच क्रीडाप्रेमी, महसूल अधिकारी, कर्मचारी, मनपा अधिकारी, कर्मचारी वर्गाने या रॅलीत सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.