Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जनतेविरोधात सत्ता स्थापन केल्याने टांगा पलटी करावा लागला!
    ताज्या बातम्या

    जनतेविरोधात सत्ता स्थापन केल्याने टांगा पलटी करावा लागला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड ;- सन 2019 मध्ये विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली, जनतेविरोधात त्यांनी सत्ता स्थापन केली, पण आम्हाला त्यांचा टांगा पलटी करावा लागला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नांदेडमध्ये हल्लाबोल केला.
    हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्हयातील हदगावमध्ये आले होते. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, अभिनेते गोविंदा, आमदार भीमराव केराम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

    मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विरोधक आमचे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणत असताना उलट अजित पवार आमच्यात सहभागी झाले. आता मनसे देखील महायुतीमध्ये आल्याने आणखीनच सरकार मजबूत झाले आहे. त्यामुळे त्यांचा ज्योतिषी कच्चा निघाला, असं म्हणत त्यांनी दीड वर्षात राबवलेल्या कामांचा पाढा वाचला. पोलीस भरतीसाठी मुदत वाढ देण्यात आली असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्यांना स्थगिती मिळाली नाही. कारण हे आरक्षण टिकण्यासाठी आमच्याकडे डेटा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

    पूर्वीचे सरकार अहंकारी होते. केंद्राकडे मदत मागायची म्हटले तर, त्यांचा अहंकार आडवा येत होता. पण, घरी आणून कोणी देत नसतं. आम्ही दिल्लीत वारंवार महाराष्ट्रासाठीच जातो. त्यांच्याकडे कोणता अजेंडा आणि झेंडा पण नाही. कमिशन आणि करप्शन, अशी त्यांची निती आहे. तर, आपल्याकडे नेशन फस्ट अर्थात राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ही निवडणूक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लिटमस टेस्ट असणार असल्याचेही ते म्हणाले.

    अभिनेता गोविंदा मैदानात
    दरम्यान, महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत सिने अभिनेता गोविंदानेही हजेरी लावली होती. यावेळी त्याने उपस्थित जनतेला बाबुराव कदम यांना विजयी करण्याचे आवाहन देखील केले.

    #election #govinda Eknath shinde Nanded
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif