पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार असल्याची टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात विरोधकांवर केली. हे सर्वसामांन्यांचे सरकार असून सरकारची सर्वाना मदत करण्याची स्पष्ट भूमिका आहे. अनेक योजना आम्ही जाहीर केल्या आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही. केंद्राचे आपल्याला पाठबळ मिळत आहे. असल्याचेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी भाषेतून केल्याने उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन , ना. उदय सामंत,ना. अनिल पाटील, आ. किशोर पाटील ,आ. चिमणराव पाटील,आ.चंद्रकांत पाटील,आ. लता सोनवणे आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण,खा. उन्मेष पाटील, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि ,अडीच वर्ष थांबले होते,आपले सरकार आल्यानंतर अनेक योजना सरकारने आणल्या. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आगामी काळात घेण्यात येणार असून याचा लाभ महिलानाला होणार आहे. महिलांसाठी ५० टक्के एसटी प्रवासात सवलत दिली. ज्येष्ठानाही हि सवलत दिली आहे. शेतकऱ्यांचाही विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना राज्याचे ६ हजार आणि केंद्राचे १२ हजार मिळणार आहे. एक रुपयात विमा योजना सुरु केली. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे.

https://fb.watch/m-SfkBcqg1/?mibextid=Nif5oz

सरकारने वर्षभरात नियम निकष बाजूला ठेऊन अनेक कल्याणकारी निर्णय घेतले.. आम्ही सर्वसामान्य कार्यरकर्त्यांमधून मोठे झालो आहेत. भीमाशंकर,शिर्डी येथे गेलो असता देवाकडे बळीराजावरील संकट दूर होऊ दे असे मागितले. सरकार शेतकर्याना न्याय देण्याचे काम करणार आहे. वर्षभरापूर्वी जे आपले सरकार आले आहे नागरिकांना लाभ देत असल्याने अनेकांना पोट दुखी झाली असून आता यापुढे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार असल्याचे बोलताच सभेत हंशा पिकला.हा पब्लिसिटी मिळविण्याचा कार्यक्रम नाही . गोरगरिबांचे,शेतकऱ्यांचे सरकार आहे, अनेकांना पोटदुखी झाली आहे.

शासन आपल्या दारी थापा मारतात लय भारी अशी टीका होते. तुम्ही घरी बसला आहात आम्ही लोकांच्या दारी जात आहोत. हे गोरगरिबांचे ,सर्वसामान्यांचे,तरुणांचे,शेतकऱ्यांचे सरकार आहे पोटदुखी अनेकांना होत आहे. जी २० कार्यक्रमांचे आयोजन भारतात करण्यात आले . त्याचे अध्यक्षपद भारताकडे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विश्वास सार्थ करून दाखविला आहे.

यांचे सरकार गेल्यानंतर यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटल्यानंतर माझ्यावर टीका झाली . मला कुणावर टीका करायची नाही . देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा शब्द पडू दिला नाही त्यांच्यावर टीका केली जात असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कितीही आरोप केले तरी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी आ. किशोर पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार,ना. गिरीश महाजन यांची भाषणे झाली . त्यांनीही आपल्या भाषणांमधून विरोधकांचा समाचार घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.