एकनाथराव खडसेंची घरवापसी होणार ?

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे दिल्लीत दाखल झाले असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने ते तातडीने दिल्ली रवाना झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. मात्र या संदर्भात एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते शरद पवारांच्या भेटीसाठी व सुप्रीम कोर्टाच्या कामासाठी आले असल्याचे म्हणाले. भाजपमध्ये जाणार असल्यास आपणास नक्की सांगणार असेही खडसे म्हणाल्याने नक्की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यापूर्वीही खडसेंनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.