भर मंचावर एकनाथराव खडसेंच्या हातातून माईक खेचला

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर येथे राष्ट्रवादी काँगेसच्या एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात भर मंचावर बोल्ट असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या हातातून माईक खेचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारामुळे मंचावर उपस्थित असलेले नेतेमंडळी आणि पदाधिकारी देखील अवाक झाले होते.

यावेळी मोठा गोंडाळ उडाला होता. दरम्यान संबंधित व्यक्तीला पदाधिकाऱ्यांनी लगेच बाजूला केलं. हा व्यक्ती त्यांच्या पक्षाचाच कार्यकर्ता होता, अशी माहिती मिळाली आहे. संबंधित घटना ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर खडसे आपल्या भाषणात म्हणाले की, जसजशी संध्याकाळ होते तसतशी घरी जायची घाई होते. एका बाजूला घरी जायचं असतं तर दुसऱ्या बाजूला तिकडं जायचं असतं. हम तो बंजारा है. हमने तो अभीतक नहीं छोडी, असं म्हणताच सभेत मोठा हशा पिकला.

Leave A Reply

Your email address will not be published.