…म्हणून एकनाथ शिंदे झाले भावूक दुःखद प्रसंगाची झाली आठवण

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

ठाणे  : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुख असतात, माझ्याही आयुष्यात तसेच क्षण आले. मात्र दुखाचे क्षण हे न विसरण्यासारखे आहेत.  या दुखात माझे संपूर्ण कुटुंब कोलॅप्स झाले होते. त्यातून बाहेर पडणो मला कठीण झाले होते. त्यात परिवार होताच असे सांगत राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाले. मात्र या दुखातून बाहेर काढण्याचे काम, धीर देण्याचे काम, पुन्हा उभे राहण्याचे काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केले असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

डॉ. काशिनाथ घाणोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ या ध्वनीचित्रफीतीच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, विविध महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रधान सचिव, एमएसआरडीसीचे अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आदींसह सिनेअभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मार्तोडकर आदींसह मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकार उपस्थित होते. आनंद दिघे हे दैवी महापुरुष म्हणून पाहतो, बाळासाहेबांनी आर्शिवाद दिले, दिघेंनी पुन्हा प्रवाहात आणले.

एकनाथ तुला बाहेर पडायचे आहे. तुझे कुटुंब मोठे आहे, लोकांसाठी जगायचे आहे. राबायचे आहे, त्यामुळे त्यांच्या शब्दांच्या ताकदीपुढे आपण काय बोलणार असे सांगत त्यांनी आपण राजकारणात कसे उभे राहिलो हे विषद केले. कोरोनाची पहिला लाट, दुसरी लाट अतिशय भयानक होती, ऑक्सीजनचा पुरवठा कमी होत होता. परंतु त्यातून आता कुठेतरी आपण बाहरे पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे एवढय़ा कौतुकाची सवय नाही, कौतुक पचनी पडत नाही, परंतु कौतुक केलेले आवडते, परंतु फक्त मला कधी अडचणीचे होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे शहरात लागलेल्या त्या फलकाच्या निमित्ताने बोलतांना कोण कुठे फलक लावतो, मी काय बघत बसू का, अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

सर्व पहायला लागते, खबरदारी घ्यावी लागते, विकासप्रकल्प राबवित असतांनाही प्रशासनाबरोबर संवाद साधत खबरदारी घ्यावी लागते. तसेच जेव्हा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणो उभे असते, तेव्हाच तुम्ही चांगले काम करु शकता, असेही त्यांनी सांगितले. आपण घेतलेल्या निर्णयांचा सर्वसामान्यांना कसा फायदा याचा विचार आधी केला पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली.

मी कमी बोलतो जास्त ऐकतो, त्यामुळे अडचणी कमी निर्माण होतात, त्यातही ऐकल्यानंतर त्या विषयाची ग्रीप आपल्याला समजते. युनीफाईडीपीसीआर बाबत निर्णय घेतले. शिवाय राज्याचे दृष्टीने इतर कसे महत्वाचे निर्णय घेतले याची माहिती त्यांनी दिली. आपण जो र्पयत फिल्डवर उतरुन काम करीत नाही. तोर्पयत काम लवकर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रश्न अनेक वर्षानंतर आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुपात आला आहे. क्लस्टर अंतिम टप्यात आले आहे, सिडकोचे अनुभव यात आता कामी येणार आहे, सिडको केवळ घरे बांधणार नसून एक सुनियोजीत शहर उभे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.