सोने – चांदीचे भाव वधारले.. जाणून घ्या नवीन भाव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होत आहे. या आठवड्यात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे आज या दोन्ही धातूंच्या किंमती वाढल्या आहेत.

सराफा बाजारात सोने-चांदी दरात पुन्हा एकदा चमक वाढू लागली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा भावही वधारला आहे. चांदीचा दर आज 0.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेंड करत आहे. 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपये असा सर्वाधिक होता. तर आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदे भाव 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. सोने अद्यापही स्वस्त दरात मिळत आहे. कोरोना काळात सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा खरेदीदार देश आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल डिलिव्हरी सोन्याचा दर 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 48 हजार 438 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 62 हजार 549 रुपये प्रति किलो असा आहे.

दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.