मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव दौऱ्यावर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 फेब्रुवारी, 2023 रोजी म्हणजेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

दुपारी जळगाव विमानतळ येथे आगमन. झाल्यावर ते हेलिकॉप्टरने भोकर, येथे जातील. त्यानंतर दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व त्याचबरोबर विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण करतील.

1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी.

2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.

3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी.

4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी.

5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.

6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी.

7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.

8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

यानंतर सायंकाळी हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा येथे एन.ई.एस. हायस्कूल पटांगणावर विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा ते घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.