मोठी बातमी.. ED चे मुंबईत विविध ठिकाणी धाडसत्र सुरु, मोठे राजकीय नेतेही रडारवर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत ईडीच्या पथकाने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीची दिल्लीतील टीम मुंबईत दाखल झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचं महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा संपत्तींची चौकशी ईडीच्या टीम्सकडून सुरू आहे. दक्षिण मुंबई परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे.

मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तसेच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ईडीचं धाडसत्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे. तसेच भाजप नेत्यांबाबत गौप्यस्फोट करण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत ईडीच्या टीमकडून सुरू असलेल्या धाडी आणि शिवसेनेची ही पत्रकार परिषद यात काही संबंध आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.