कोयना परिसरात भूकंप…

0

 

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज दि. 22 जुलै ला. दुपारी 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली 9 किलोमीटर इतकी होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस 7 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे.

 

गेल्या पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक लक्षात कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. भूकंपापासून कोयना धरणास कोणताही धोका नसून या भूकंपाने परिसरात प्रथम दर्शनी कोणतीही वित्त वा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना व्यवस्थापन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.