जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली.

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली. दिल्ली-एनसीआर (नोएडा) आणि चंदीगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तेथील लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, आतापर्यंत भूकंपामुळे देशात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानातही ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान सीमेवरील हिंदुकुश टेकड्यांजवळ होता. मात्र, याआधी पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.३ होती. त्याचा केंद्रबिंदू इस्लामाबादपासून १८९ किमी अंतरावर होता. नंतर भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.