मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध केली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
To help students of class Xth & XIIth prepare for the state board exams, @scertmaha will be providing subjectwise question banks. These will be available at https://t.co/7bvguKy0S3 Students should avail themselves of the benefit. @MahaDGIPR @CMOMaharashtra pic.twitter.com/o33idV3dDX
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 4, 2022
राज्य मंडळाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय Question Bank विकसित करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी या Question Bank चा संपूर्ण लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत. या Question Bank http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.