पाचोरा तालुक्यात दुध संघाच्या निवडणुकीत १०० टक्के मतदान…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

संपुर्ण राज्यात अतितटीची मानली जाणारी जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक आज पार पडली. त्यात १०० टक्के मतदान झाले आहे. पाचोरा तालुक्यात ७६ पैकी ७६ मतादारांनी आपला मतादानाचा हक्क बजावला असुन आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित, जळगांव व्यवस्थापक समितीची सन २०२२ – २७ या कालावधीसाठी आज १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पाचोरा तालुक्यात राजकीय भुकंप करत शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. आ. दिलीप वाघ यांच्या समोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात अनिल भाईदास पाटील – स्मिता उद्य वाघ, भडगाव – रावसाहेब प्रकाश पाटील – डॉ. संजीव कृष्णराव पाटील, भुसावळ – शालिनी मधुकर ढाके – शामल अतुल झांबरे, बोदवड – रविंद्र प्रल्हादराव पाटील – मधुकर रामचंद्र राणे, चाळीसगाव – प्रमोद पांडुरंग पाटील – सुभाष पाटील, चोपडा – रोहित दिलीप निकम – इंदिराबाई भानुदास पाटील, धरणगाव – वाल्मिक विक्रम पाटील – संजय मुरलीधर पवार, एरंडोल – दगडु धोंडु चौधरी – भागचंद मोतीलाल जैन, जळगांव – मालतीबाई सुपडु महाजन – गुलाबराव रघुनाथ पाटील, जामनेर – गिरीष दत्तात्रय महाजन – दिनेश रघुनाथ पाटील, मुक्ताईनगर – मंगेश रमेश चव्हाण – मंदाकिनी एकनाथ खडसे, पारोळा – चिमणराव रुपचंद पाटील – सतिष भास्कर पाटील, रावेर – जगदिश लहु बढे – ठकसेन भास्कर पाटील, यावल – हेमराज खुशाल चौधरी – नितीन नारायण चौधरी यांचेसह महिला राखीव मतदारसंघातुन – छाया गुलाबराव देवकर, पुनम प्रशांत पाटील, सुनिता राजेंद्र पाटील, उषाबाई विश्वासराव पाटील, मनिषा अनंतराव सुर्यवंशी, इतर मागास प्रवर्ग मतदार संघासाठी – गोपाळ रामकृष्ण भंगाळे – पराग वसंतराव मोरे, विमुक्त जाती भटक्या जमाती व विमुक्त मागास प्रवर्ग मतदार संघासाठी अरविंद भगवान देशमुख – विजय रामदास पाटील, अनुसूचित जाती जमाती मतदार संघासाठी – श्रावण सदा ब्रम्हे – संजय वामन सावकारे या उमेदवारांची मते मदपेटीत बंद झाली आहेत.

पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये पार पडली मतदान प्रक्रिया केंद्र प्रमुख गौतम बाविस्कर, एस. एस. पवार, ए. टी. पाटील, जितेंद्र जोशी, प्रेमसिंग पाटील या सहकार निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.