मनवेल आठवडे बाजारात सुकामेवा खरेदीला लगबग…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

हिवाळ्यात शरीरात उर्जा टिकून राहावी व ताजेतवाने तसेच उबदार वाटावे तसेच शरीराला बलवान व आरोग्य वर्धक बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मेथीचे लाडु बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आठवडे बाजारात सुकामेव्याला वाढती मागणी होत असल्याचे चित्र आहे.

हिवाळ्यात थंडीमुळे भुक, पचन क्षमता वाढते म्हणून दैनंदिन आहारात स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी मेथीचे लाडु पौष्टिक असतात. ऋतूनुसार आहारात बदल होत असतो, बाजरीची भाकर हिवाळ्यात उपयुक्त ठरते त्यामुळे बाजरी व त्याचप्रमाणे मध याचीही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

ग्रामीण भागात हिवाळ्यात सकाळचा नास्ता म्हणून मेथीचे लाडु घरोघरी बनविले जात असते मात्र सुकामेव्याच्या भावात वाढ झाल्यामुळे गरीबांच्या आवाक्याचा बाहेर असल्यामुळे यावर्षी सुकामेव्याच्या खरदीला चांगली गर्दी होत असली तरी वाढती महागाईची झळ यावर्षी धंद्यांवर बसली असल्याचे सुका मेवा विक्रेता जब्बार यांनी सागीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.