‘ड्रीम गर्ल’ पुन्हा येणार चाहत्यांच्या भेटीला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) हा चित्रपट रसिकप्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडलापडला होता. त्यात आयुष्मानने ज्या प्रकारे आपल्या आवाजात बदल करून पूजाचे कॅरेक्टर प्ले केले होते, ते अगदीच कौतुकास्पद होते. आता त्याच चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची माहिती आयुष्मान ने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल’च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. चित्रपटात आयुष्मानने पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारले होते, आयुष्मानने मुलीच्या आवाजात बोलत तरुणांना चित्रपटात घायाळ केले होते.टीझरच्या माध्यमातून चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा करण्यात आली असून चित्रपटात नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना दिसणार आहे.आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा हास्यकल्लोळ करणारा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या माध्यमातून आयुष्मानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओत आयुष्मान पूजाच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर त्याला पठाणचा फोन येतो आणि त्यानंतर पूजा परत कधी येणार याची तारीख समजते.व्हिडिओमध्ये, आयुष्मान पलंगावर पूजा म्हणून बसलेला आणि गुलाबांच्या सुगंधाचा आनंद घेताना दिसत आहे, जेव्हा तिचा फोन वाजतो. तेव्हा ती म्हणते, ” मी पूजा बोलते, आपण कोण?” तितक्यात समोरुन आवाज येतो, “पूजा मी पठान.” पठानचा आवाज ऐकून पुजा पटकन उभी राहते, आणि म्हणते, “उफ्फ, कसा आहेस माझा पठान?”त्यानंतर दोघांमध्ये पुढे रोमँटिक मुडमध्ये संभाषण सुरु असते. टीझरमध्ये ‘पठान’ पुजाला सांगतो की लवकरच त्याचा आगामी ‘जवान’ चित्रपट येत आहे. तर त्यावर पुजा म्हणते, ‘लवकरच मला पण जवानी येत आहे.’ त्यानंतर ‘पठान’ पुजाला विचारतो की, तू कधी पर्यंत येते. त्यावेळी पुजा म्हणते, सातला तुझ्या सोबत. अर्थात, ड्रीम गर्लचा दुसरा भाग ७ जुलैला प्रदर्शित होत आहे. मात्र निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका खास निर्मात्यांनी पद्धतीने जाहीर केली आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.